Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

छत्रपतींचे दर्शन घेण्यापासून शिवभक्तांना रोखता येणार नाही : मुख्यमंत्री

छत्रपतींचे दर्शन घेण्यापासून शिवभक्तांना रोखता येणार नाही : मुख्यमंत्री

शिवनेरी : खरा पंचनामा

छत्रपती शिवरायांचा मावळा राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. संभाजीराजे छत्रपती आपण केलेल्या सर्व सुचनांची आम्ही दखल घेतली आहे. कोणत्याही शिवभक्तांना शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही. यावेळी नियोजनात काही त्रुटी राहून गेल्या असतील, यापुढे या त्रुटी राहणार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. संभाजीराजे छत्रपती आपण सुचना करा, त्याचा विचार करुन अमंलबजावणी केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवनेरी गडावर राज्याच्या पर्यटन विभागाने शिव जन्मोत्सवाचे आयोजन केलं आहे. अवघा परिसर भगवामय झाला आहे. भगव्याची लाट याठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या मना मनामध्ये शिवरायांचा आदर्श आहे. आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

संभाजीराजे आपण केलेल्या सर्व सूचना जनतेच्या हिताच्या आहेत. त्या सर्व सुचनांची आम्ही दखल घेतली आहे. त्यामुळं आपण जसा रायगडला पुढाकार घेतला. तशाच पद्धतीनं सर्व गडकोट किल्ल्यांवर संवर्धन करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. संभाजीराजे आपण सूचना करा त्या सूचनांचा विचार करुन अंमलबजावणी केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. वडू तुळापूरसाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. नियोजनता काही त्रुटी दूर केल्या जातील. प्रशासनाला तश्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवनेरी गडावर गर्दीमध्ये सामान्य शिवभक्तांची अडवणूक झाल्याने संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी संतप्त शिवभक्तांच्या भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या. व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांच्या अडवणूक कशासाठी करता? अशी थेट विचारणा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

संभाजीराजे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत त्यांच्या भावना समजावून घेतल्या. ते म्हणाले की, आपल्या भावनांशी आम्ही एकरूप आहोत. आम्ही तुमच्या भावनांची दखल घेतली आहे. राज्यातील गडकोट संवर्धन करण्याचं काम सरकारकडून नक्की केले जाईल असेही ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.