Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सभ्य फडणवीस असत्याचा आधार घेतील असे वाटले नव्हते!

सभ्य फडणवीस असत्याचा आधार घेतील असे वाटले नव्हते!

मुंबई : खरा पंचनामा 

पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. असा गौप्यस्फोट नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत तसेच सभ्य व्यक्ती आहेत. ते असत्याचा आधार घेत अशी वक्तव्य करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. 

देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत तसेच सभ्य माणूस आहेत. ते असत्याचा आधार घेऊन अशी वक्तव्य करतील अस मला कधीच वाटलं नाही असं पवार यांनी म्हटलं आहे. पहाटेच्या शपथविधीविषयी शरद पवारांशी चर्चा झाली होती असा आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. 

ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता,' असं फडणवीस म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.