महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आजपासून तीन दिवस सुनावणी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुरू होणार आहे. सलग तीन दिवस ही सुनावणी होणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही बाजूचे वकिल आजपासून तीन दिवस युक्तिवाद करणार आहेत. खरंतर यापूर्वीही मागील आठवड्यात सलग तीन दिवस युक्तिवाद झाला आहे. त्यामध्ये 16 आमदार अपात्रतेचा मुद्दा, विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव, विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव की नोटिस यांसह उद्धव ठाकरे यांचा राजीनामा याविषयी युक्तिवाद झालेला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व याचिका एकत्रित करून पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे जावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, हे संपूर्ण प्रकरण आता पाच न्यायमुर्तीच्या खंडपीठासमोरच होणार आहे.
यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा 16 आमदार अपात्र होणार आहेत का ? यासाठी नेमका काय युक्तिवाद पुन्हा केला जाईल याकडे लक्ष लागून राहिले आहे.
दहाव्या सूचीनंतर विधानसभा अध्यक्ष यांचे अधिकार काय आहेत? यावर कोर्टाचं काय म्हणणं असेल हा देखील महत्वाचा मुद्दा असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित 16 आमदार यांचा अपात्रतेच्या बाबतीच ठाकरे गटाकडून अधिक प्रभावीपणे युक्तिवाद केला गेला आहे. मात्र, त्याच वेळी शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष यांनी केलेली कारवाई नियमाला धरून नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.
याशिवाय उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचा दावाही सुप्रीम कोर्टात करण्यात आला आहे. त्यावर देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे प्रकरण देखील ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. त्यावरून ठाकरे गटाने आक्षेप घेत थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामध्ये ही सुनावणी देखील एकत्र घेतली जाईल का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.