Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'कोल्हापुरी' चप्पल जीवघेणे हत्यार नाही!

'कोल्हापुरी' चप्पल जीवघेणे हत्यार नाही! औरंगाबाद : खरा पंचनामा 

अनेकदा पोलिसांकडून खोटे गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप होतो. मात्र पुढे न्यायालयात प्रकरण टिकत नाही हे स्पष्ट झाले आहे. एका प्रकरणात निकाल देताना औरंगाबाद खंडपीठाने दखलपात्र गुन्ह्यासह फौजदारी खटला रद्द करत भादंवि कलम 324 नुसार कोल्हापुरी चप्पलला 'जीवघेणे हत्यार' (डेन्जरस वेपन) म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवला आहे. 

औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. अनुजा प्रभुदेसाई आणि न्या. आर. एम. जोशी यांनी यांनी याबाबत निकाल दिला आहे. कोल्हापुरी चपलेने मारहाण केल्याच्या सख्ख्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 324 अन्वये नोंदविलेला 'दखलपात्र गुन्हा' तसेच कथित घटना घराच्या पायरीवर घडल्यामुळे पोलिसांनी दाखल केलेला भादंवि कलम 452 नुसारचा घुसखोरीचा दखलपात्र गुन्हा रद्द केला. त्याचप्रमाणे गुन्ह्यांच्या अनुषंगाने केजच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातील प्रलंबित फौजदारी खटला सुद्धा रद्द केला आहे. 

बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील मंगेश मंचकराव देशमुख आणि त्यांची पत्नी श्रद्धा यांनी मंगेशचा सख्खा भाऊ अनंत देशमुख यांना घरात घुसून कोल्हापुरी चपलेने मारहाण केल्याची तक्रार दिली होती. त्यावरून केजच्या पोलिसांनी पती-पत्नी विरुद्ध भादंवि कलम 452,324, 323, 504 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात फौजदारी खटला दाखल झाला होता. त्यामुळे हा गुन्हा आणि खटला रद्द व्हावा, यासाठी मंगेश आणि त्यांच्या पत्नीने खंडपीठात धाव घेतली होती. ज्यात निकाल देताना कोल्हापुरी चप्पल जिवघेणे हत्यार होऊ शकत नाही असे म्हणत न्यायालयाने दखलपात्र गुन्ह्यासह फौजदारी खटला रद्द केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.