Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कसब्यात देवेंद्र फडणवीस यांनी फिरवली जादूची कांडी!

कसब्यात देवेंद्र फडणवीस यांनी फिरवली जादूची कांडी!



पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत सर्व पक्ष आपली ताकद लावताना दिसत आहेत. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या घरातच उमेदवारी दिली जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी वेगळा निर्णय घेतल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांनी नाराजी बोलून दाखवली होती. रासने यांच्या अर्ज भरण्याच्या वेळी टिळक कुटुंबातील कोणीच उपस्थित नव्हते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जादूची कांडी फिरवल्याचं दिसत आहे.

हेमंत रासने यांनी सकाळी उमेदवारीचा अर्ज भरला होता. परंतु अर्ज भरताना टिळक कुटुंबातील कोणीच उपस्थित नव्हतं. त्यामुळे टिळक कुटुंब नाराज असल्याचं उघडपणे दिसून आलं. कुणाल टिळक आणि शैलेश टिळक यांनी आपल्या घरात उमेदवारी यायला हवी अशी मागणी केली होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी शैलेश टिळक यांना फोन करत मनधरणी केली. नाराजी दूर करून मैदानात उतरा असं आवाहन फडणवीसांनी केलं.

देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर भाजपने निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये टिळक कुटंबाने उपस्थिती लावली. या बैठकीला शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांनी हजेरी लावली. एकंदरित या नाराजीनाटयावर पडदा पडला आहे. सोमवारी दुपारी भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली. टिळक परिवाराला उमेदवारी द्यायला तयार आहोत मात्र महाविकास आघाडीने उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घ्यावी, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.