रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य वादग्रस्त वक्तव्याबद्दल कोश्यारी यांच्याबद्दल राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वादग्रस्त राहिलेल्या कोश्यारी यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी जोरदार त्यांना बदलण्याची मागणी लावून धरली होती.
त्यानंतर कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पदमुक्त करण्याची मागणी केली होती. आता राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.