दोन स्टार लागले म्हणून तू डॉन झाला का?
औरंगाबाद : खरा पंचनामा
चोरी, दारु, वेश्याव्यवसाय, जाळपोळ असे गुन्हे दाखल असलेल्या एका गुन्हेगाराने थेट पोलीस अधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हेगाराने अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप स्वत:च्या सोशल मीडियावर व्हायरल देखील केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.
जीवन केसरसिंग जारवाल राजपूत (वय 24) असे ताब्यात घेण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. जीवन राजपूत जाळपोळ आणि शरिराविरुद्धच्या गुन्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याने एका हॉटेलमध्ये आग लावून हॉटेल जाळले होते. तसेच इतर काही गुन्ह्यांमध्ये चिकलठाणा पोलीस त्याचा शोध होते.
पोलीस आल्याचे समजताच तो प्रत्येकवेळी पळून जात होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चिकलठाणा पोलीस ठाण्यातील एक पथक त्याचा शोध घेत होते. त्यावेळी एका ठिकाणी त्याचा साथीदार पोलिसांना दिसला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्या साथीदाराने राजपूत याला फोन लावून दिला. त्यावेळी राजपूत याने पोलीस अधिकाऱ्याला फोनवर शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
जीवन राजपूत याने पोलीस अधिकाऱ्याला फोनवर शिवीगाळ करताना म्हणाला, पीएसआय आहे म्हणून माजला का? तुझ्यात दम असेल तर मला अटक कर, माझ्यात दम असून, तुला मी मारणार म्हणजे मारणारच. तू टोले खाणार आहे. माझी खूप लहान केस आहे, मला तुम्ही उगाच परेशन करु नका, मला अटक करा आणि आतमध्ये टाका हे तुम्हाला आधीच सांगितले होते. मी मागे सरकत नाही.
तुला दोन स्टार लागले म्हणजे तू डॉन झाला का? मी एकटा येऊन तुला भिडतो, कुठ भिडायचं सांग... औरंगाबादमध्ये मी सहा ठिकाणी धंदे करतो. लपून-छपून धंदे मी करत नाही, असे या ऑडिओ क्लिपमध्ये राजपूत पोलीस अधिकाऱ्याला बोलत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.