Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात दोन दुचाकी चोरट्यांना अटक : राजारामपुरी पोलिसांची कारवाई

कोल्हापुरात दोन दुचाकी चोरट्यांना अटक : राजारामपुरी पोलिसांची कारवाई 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर येथील राजारामपुरी येथे दोघा दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली. राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 

सचिन हनुमंत नागणे (वय ४२, रा. बिजली चौक, जवाहरनगर, कोल्हापूर), विनोद सजेर्राव मुसळे (वय ३२, रा. अतिग्रे, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त अधीक्षक जयश्री देसाई यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. 

राजारामपुरी येथील शाळा क्रमांक ९ जवळ दोन संशयित फिरत असल्याची माहिती निरीक्षक तनपुरे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वी टाकाळा येथून तर एक महिन्यापूर्वी रूई येथून चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक भगवान शिंदे, अमर आडूळकर, नितीन मेश्राम, विशाल खराडे, विशाल खराडे, विशाल शिरगावकर, रविकुमार अंबेकर, अविनाश तारळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.