Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भिगवणमध्ये तरुणाचा खून करून मृतदेहाचे केले तुकडे

भिगवणमध्ये तरुणाचा खून करून मृतदेहाचे केले तुकडेइंदापूर : खरा पंचनामा

तालुक्यातील भिगवण -तक्रारवाडी येथे नदीपात्रालगत तीसवर्षीय युवकाचा हात-पाय, शिरविरहित पाच तुकड्यांमध्ये असलेला मृतदेह आढळून आला आहे. धारदार शस्त्राने  निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.

मुंडके नसलेल्या शरीराचे पाच तुकडे करून प्लॅस्टिक पिशवीत भरल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट झाले. विवस्त्र अवस्थेतील या अनोळखी युवकाचे अवयव तक्रारवाडी गावानजीक उजनी पाणलोट क्षेत्रात आढळून आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. 

गुरुवारी भिगवण जवळील तक्रारवाडी गावानजीक उजनी पाणलोट क्षेत्रात अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या व्यक्तीचा मानेपासून शिर वेगळे केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे खांद्यापासून दोन्ही हात आणि मांडीपासून दोन्ही पाय वेगळे केलेले शरिराचे अवयव निळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत भरलेले मिळून आले. याबाबतची फिर्याद तक्रारवाडीचे पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी दिली आहे. 

मृताच्या उजव्या हाताच्या मनगटाच्या पोटरीवर टॅटू काढलेला असून, याबाबत कोणास माहिती असल्यास भिगवण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.