Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखलकागल : खरा पंचनामा

संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी दहा हजार प्रमाणे शेअर्स भांडवल घेतले. यामध्ये 40 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद मुरगुड पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यानुसार माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

विवेक विनायक कुलकर्णी व अन्य 16 जणांनी ही फिर्याद दिली आहे. दरम्यान, मुश्रीफ समर्थकांनी मुरगूड पोलिस ठाण्याला गराडा घालून यास तीव्र आक्षेप घेतला. 2012 च्या दरम्यान, व्यक्तिगत संपर्कातून साखर कारखाना उभारणीसाठी मुश्रीफ यांनी खुले आवाहन करून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर्स भांडवल घेतले. पण या संबंधातील कोणतीही पावती व शेअर्स सर्टिफिकेट दिले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

चौकशीसाठी घोरपडे साखर कारखाना हा केवळ मुश्रीफ कुटुंबीय व अन्य नातेवाईक अशा एकूण 17 जणांचा कारखाना असल्याचे दिसून येते. असे असताना, मुश्रीफ यांनी राजकीय पदांचा गैरफायदा घेत गोरगरीब व शेतकऱ्यांची 40 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या फिर्यादीनुसार व पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्हा दाखल केल्याचे मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले. 

आ. मुश्रीफांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजताच मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्यासह कार्यकर्ते मुरगूड पोलिस ठाण्यासमोर जमले होते. त्यांनी या घटनेचा निषेध केला.

तक्रारीची शहानिशा न करताच गुन्हा कसा दाखल केला? राजकीय सूडापोटी हे कृत्य केले आहे याची आपणास माहिती नाही का? अशी विचारणा करीत, आमचीही समरजित घाटगेंविरुद्ध तक्रार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी कागल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील, शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, देवानंद पाटील आदींनी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.