Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अंबानींनी दिली अदानी यांना धोबीपछाड!

अंबानींनी दिली अदानी यांना धोबीपछाड!मुंबई : खरा पंचनामा

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. शेअर बाजारातील 'धोबीपछाड'मुळे अदानींना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. यामुळे अंबानींना फायदा झाला असून ते पुन्हा 'नंबर वन' वर पोहोचले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आता गौतम अदानींना मागे टाकत भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

फोर्ब्स श्रीमंतांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 84.3 ब्ज डॉलर झाली आहे. दरम्यान, गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आहे, परिणामी अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. शेअर मार्केटमधील पडझडीमुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 83.9 अब्ज डॉलर इतकी घसरली आहे. फोर्ब्सनुसार, गौतम अदानी आता श्रीमंतांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत, तर अंबानी नवव्या क्रमांकांवर आहेत.

यामुळे आता भारतातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रिपोर्टनुसार, अदानी समुहाला मागील 24 तासांत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गौतम अदानी यांना गेल्या 24 तासांत सुमारे 10 अब्ज डॉलरचे नुकसान झालं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.