Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फसवणूक करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना : फुलारी

फसवणूक करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना : फुलारी 



सांगली : खरा पंचनामा 

शेअर मार्केटसह आर्थिक फसवणूकीच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. सांगली जिल्ह्यातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील पसार आरोपींचा शोध घेवून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फसवणूक करणाऱ्यांकडून मालमत्ता जप्त करण्याबाबत संबंधित तपास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

सांगली जिल्ह्यातील गुन्हे प्रकटीकरण समाधानकारक आहे. जिल्ह्यातील पोलिस दल सशक्त करण्यावर भर देवू. शेअर मार्केटसह आर्थिक फसवणूक आणि गुन्हेगारी रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही फुलारी यांनी आज दिल्या. फुलारी यांनी पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच ते सांगलीत आले होते. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक अजित टिके, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते. 

बुधवारी दुपारी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा फुलारी यांनी घेतला. विशेष सूचनाही संबंधित तपास अधिकाऱ्यांनी देण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांतील गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे समाधानकारक काम आहे. बेसिक पोलिसींगवर भर देण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस आणि जनतेसोबतची वर्तवणूक याबाबतही या आढावा बैठकीत चर्चा झाली. आगामी सण, उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्ताच्या सूचनाही देण्यात आल्या. 

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोकासह वाळू तस्करांवर तडीपारीसह कारवाईच्या प्रस्ताव तयार केले आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. तसेच सायबर गुन्ह्यांबाबत जानजागृती व्हावी, यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादींना परत देण्याच्या कायदेशीर बाबीही आधिकाऱ्यांना सांगण्यात आल्या आहेत. 

सांगलीतील पोलिसांच्या निवासस्थानाबाबत ते म्हणाले, पोलिस वसाहतीचा आराखडा तयार आहे. कोरोनाच्या काळात हे काम रखडले. प्रत्यक्षात इस्लामपूर, जत आणि विश्रामबाग परिसरातील वसाहतींचा आराखडा तयार आहेत. ३८७ घरे पोलिसांना देण्यात येणार आहेत. प्रत्येकाला २ बीएचके फ्लॅट दिले जातील.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.