Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरच्यांना भेटण्यासाठी आलोय : हसन मुश्रीफ

घरच्यांना भेटण्यासाठी आलोय : हसन मुश्रीफ 



कागल : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापा टाकल्यानंतर तब्बल 52 तासांनी ते थेट कागलमध्ये दाखल झाले. कागलमध्ये दाखल झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, ईडीचे पथक घरी येऊन गेले. ईडीने नोटीस पाठवली आहे. टीव्हीवर घरच्यांची अवस्था दिसल्याने मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. 

ते म्हणाले, ईडीकडून नोटीस आल्याने वकिलांना ईडीकडून मुदतवाढ घेण्यास सांगितली आहे. मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाअखेर असल्याने त्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी आहे. त्यामुळे ईडीच्या समन्सला उत्तर देण्यासाठी महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. पहिल्या केसमध्ये केसमध्ये माझे नाव नव्हते. त्यामुळे त्यांना ईडीला उत्तर देऊन त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

आज त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहे. मात्र, ते वकिलांच्या माध्यमातून बाजू मांडणार आहेत. दरम्यान, नॉट रिचेबल असलेल्या हसन मुश्रीफ यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, पक्षाकडूनही त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. मात्र, आता मुश्रीफ थेट कागलमध्ये दिसून आल्याने पक्षाला आणि कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

हसन मुश्रीफ यांचा सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, अप्पासाहेब नलवडे कारखाना कर्ज प्रकरण तसेच ब्रिक्स कंपनीवरुन ईडीने दोन महिन्यात तीनदा छापे टाकले आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेवरही ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. शनिवारी ईडीच्या पथकाने चौकशीनंतर बाहेर पडताना 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांना समन्स बजावले होते. 

किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर दोन वेळा, तर घोरपडे कारखाना व जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह दोन शाखांवर यापूर्वी 'ईडी'ने छापे टाकले आहेत. जिल्हा बँकेतून या दोन कारखान्यांना दिलेली कर्जे नियमानुसार असल्याचा खुलासा बँकेने केला असला, तरी मुश्रीफ यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा पडला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.