Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरज सिव्हीलचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपात सहभागी

मिरज सिव्हीलचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपात सहभागीसांगली : खरा पंचनामा

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यभरातील शासकीय-निमशासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालच्या रूग्णालयातील नर्सेस सोमवारी मध्यरात्रीपासूनच या संपात सहभागी झाले आहेत. सोमवारी रात्री कतर्व्यावर असलेल्या नर्सेस, परिचारक यांच्यासह सर्व कमर्चाऱ्यांनी रात्री बारापासून संपात सहभाग नोंदवला. यामध्ये सुमारे ३५० कमर्चारी सहभागी झाल्याची माहिती महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्ष इंदूमती थोरात, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हशमत हवेरी यांच्या मागर्दशर्नाखाली सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे संघटनेच्या मिरज शाखेच्या अध्यक्ष प्रतिभा हेटकाळे यांनी सांगितले.  

राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात राज्यातील ३५ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे आजपासून शासकीय कार्यालये सुरू असली तरी कमर्चारी संपावर गेल्याने शासकीय कार्यालयांचे काम ठप्प होणार आहे. 

मिरजेतील शासकीय रूग्णालयात नर्सेस संघटनेने रात्री बारा वाजल्यापासून संप सुरू केला आहे. रात्री संघटनेच्या अध्यक्ष प्रतिभा हेटकाळे यांच्या नेतृत्वाखाली रूग्णालयातील रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. दरम्यान सांगलीतील सिव्हील हॅस्पिटलमधील कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत. मंगळवारी सकाळपासून त्यांनी सांगलीतील रूग्णालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली. 

मिरजेतील संपात नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष प्रतिभा हेटकाळे, उपाध्यक्ष वरूण सत्याचारी, सचिव विवेक कुरणे, सहसचिव सारिका घव्हाळी, कार्याध्यक्ष मेघा कदम, जितेंद्र आरसूड, कोषाध्यक्ष प्राची वाघमारे, सह कोषाध्याक्ष आशिष ओंबासे, संघटक विशाल सावर्डेकर, शेखर साठे, सॅमसन दारूवाला, हमीद मुल्ला, संतोष कांबळे आदी सहभागी झाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.