Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा : फडणवीस

आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा : फडणवीस



मुंबई : खरा पंचनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सरवणकर यांच्याकडील रिव्हॉल्वरचं लायसन्सदेखील रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“राज्यात लोकप्रतिनिधी आणि खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार हा विषय आपण मांडला होता. ज्यामध्ये आपण सदा सरवणकर यांचा विषय मांडला होता. या नमूद गुन्ह्यामध्ये 14 साक्षीदार तपासले. या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असे एकूण 11 जणांना कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“त्याचप्रमाणे त्यांचं जे लायसन्सधारी पिस्तूल आहे ते त्यांनी स्वत: सोबत बाळगणं आवश्यक असताना त्यांनी ते गाडीत ठेवलं. असं ते ठेवता येत नाही. त्यामुळे आर्म्स अॅक्ट 1969 चे कलम 30 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी लायसन्स आणि शर्थी नियमांचं उल्लंघन केलं असल्याने त्यांना जो काही शस्त्र परवाना दिलाय तो रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.