Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विट्यात जागेच्या वादातून डोक्याला पिस्तुल लावून मारहाण : परस्पर विरोधी फिर्यादी

विट्यात जागेच्या वादातून डोक्याला पिस्तुल लावून मारहाण : परस्पर विरोधी फिर्यादीविटा : खरा पंचनामा

विटा येथे जागेच्या वादातून डोक्याला पिस्तूल लावून एकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून विटा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत. दोन्ही गटातील मिळून 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली.

हर्षवर्धन कृष्णा जाधव (रा. शाहूनगर, विटा) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज जोतीराम दबडे, हर्षल निकम, अभि शिंदे, ओंकार साळुंखे, धनाजी जाधव, समराय तंबुगे (सर्व रा. विटा) तसेच तीन अनोळखी महिला (पूर्ण नाव नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सतिश बाबासो पालवे (वय ३४, कातरखटाव, ता. खटाव, जि. सातारा, सध्या आंबेडकरनगर, विटा) याच्या फिर्यादीनुसार हर्षवर्धन जाधव याच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव याच्या जागेत अतिक्रमण करून बांधकाम सुरू आहे. तुम्ही तुमच्या जागेतील हद्दीत बांधकाम करा, असे ते सांगत असताना पंकज दबडे, हर्षल निकम, अभि शिंदे यांनी स्वत: जवळील पिस्तूल जाधव याच्या डोक्याला आणि छातीला लावून शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच जाधव याच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याचे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर हर्षवर्धन जाधव याने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत सतिश पालवे यांनी फिर्याद दिली. पालवे हा गुरूवारी रात्री सातच्या सुमारास चारचाकी (एमएच 09 सीओ 0903) मधून विट्यातील विवेकानंदनगरात पंकज दबडे यांच्या बांधकामांवर रेडीमेड क्राँक्रीट पोहोच करण्यासाठी गेला होता. यावेळी हर्षवर्धन जाधव याने पालवे याच्या गाडीच्या केबीनच्या काचा फोडून ४० हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच या जागेचा वाद माझ्याशी चालू आहे. तू इथे गाडी घेवून का आलास, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.