Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिंदे-फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाचा झटका!

शिंदे-फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाचा झटका!



मुंबई : खरा पंचनामा

उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती असून गेल्या आर्थिक वर्षात कोणाला किती निधी दिला? याचे तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देशही राज्य सरकारला दिले आहेत. न्यायालयाने दिलेला आदेश शिंदे-फडणवीस सरकारला झटका दिल्याचे मानले जात आहे.

शिंदे- फडणवीस सरकारने कोणत्या आमदाराला किती निधी दिला? या निधीबाबत तपशीलवार माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करा, असे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाने आमदारांच्या निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप केला होता. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी या सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने शिंदे सरकारला निधी वाटपाबाबतची तपशीलवार माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश दिले.

शिंदे सरकारने सत्ताधारी आणि विरोधकांच्या आमदार निधीमध्ये तफावत केल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिकाही दाखल केली होती. यात शिंदे सरकारने आमदारांना निधी वाटताना ठाकरे गटाच्या आमदारांना झुकतं माप दिल्याचा आरोप केला होता. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालसाने नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधीच्या वाटपावर स्थगिती लावत गेल्या वर्षांतील आमदार निधीवाटपाचा तपशील मागवला आहे. न्या. गिरीष कुलकर्णी आणि न्या. आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.