Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा; ईडीचे छत्रपती संभाजीनगरमध्ये छापे

पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा; ईडीचे छत्रपती संभाजीनगरमध्ये छापे



मुंबई : खरा पंचनामा

पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा प्रकरणी ईडीकडून छत्रपती संभाजीनगरातील 9 ठिकाणी शुक्रवारी छापे टाकण्यात आले. सकाळी लवकर शहरातील 3 ठिकणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. 

याप्रकरणी यापूर्वीच शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यात 40 हजार घरांच्या जवळपास 4 हजार कोटींच्या या प्रकल्पात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निविदा घोटाळ्यात अडकलेल्या समरथ कन्स्ट्रक्शन, इंडो ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपन्यांनी संयुक्त भागीदारीमध्ये पुणे परिसरात बांधलेल्या बहुमजली इमारतींची पाहणी करण्यासाठी महापालिकेने समिती स्थापन केली आहे. ही समिती या कंत्राटदारांनी बांधलेल्या इमारतींची पाहणी करून अहवाल सादर करणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक अभिजित चौधरी यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.