सांगलीत बारच्या 'मंथली'साठी येणाऱ्या गाडीची चर्चा!
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील बिअर बार, वाईन शॉप, देशी दारू दुकाने, ताडी विक्रीची दुकाने येथून मंथली गोळा केली जात असल्याची चर्चा आहे. ही मंथली गोळा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातुन एक गाडी येत असल्याचीही चर्चा आहे. मंथली गोळा करणारा तो कोण, कोणत्या विभागाचा याची चर्चा जोरात सुरू आहे.
कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाचा एक कलेक्टर सांगली जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला चकरा मारत असतो. त्या पथकाचे मंथली गोळा करण्याचे काम त्याच्याकडे दिले असल्याचे तो नेहमीच सांगत असतो. सांगली जिल्ह्यातील बार, दुकानांमध्ये त्याचा चांगलाच वट आहे. बेकायदा तसेच गोवा व अन्य बनावटीची विक्री करणाऱ्यांच्या गळ्यातील तो ताईत बनल्याचेही बोलले जात आहे.
कोल्हापूर विभागाच्या उप आयुक्तांनी मात्र त्याला असे करण्यापासून अनेकदा परावृत्त केले आहे. दमही दिला आहे. उपायुक्त त्याच्याकडून काहीच घेत नाहीत. मात्र त्याला या मंथलीची चटक लागली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना त्याचा नाहक त्रास होत आहे. मध्यरात्रीपर्यंत बार, दुकाने सुरु ठेवणाऱ्यांना मात्र त्याचा चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे त्यांचा भेसळीचा धंदा जोमात सुरू आहे. शिवाय भरारी पथक केव्हा सांगलीत येणार आहे याची 'टिप'ही तो संबंधितांना देत असतो. त्यामुळे भेसळ करणारे दारू माफिया सावध होत आहेत.
बार, दुकानात होणारे अवैध धंदे बंद करायचे असतील तर कोल्हापूर विभागाच्या उप आयुक्तांनी मंथली गोळा करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्याकडून केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.