Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिलेला मारहाण करून लुटणाऱ्यास अटक : विश्रामबाग पोलिसांची कारवाई

महिलेला मारहाण करून लुटणाऱ्यास अटक : विश्रामबाग पोलिसांची कारवाईसांगली : खरा पंचनामा

सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात महिलेला मारहाण करून तिच्याकडील दागिने लुटणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे दागिने, दुचाकी असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.

अमित सुभाष पळसे (वय 38, मूळ रा. नरवाड, ता. मिरज, सध्या रा. कबनूर, ता. हातकणंगले) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांचे एक पथक तयार केले होते. 

विश्रामबाग परिसरात दि. 25 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या चालत जाणाऱ्या महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील टॉप्स लंपास करण्यात आले होते. निरीक्षक मोरे यांना ही लूटमार अमित पळसे याने केल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, अनिल ऐनपुरे, आदिनाथ माने, दरीबा बंडगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.