Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्यांची गय नाही : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा इशारा

अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्यांची गय नाही : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा इशारा सांगली : खरा पंचनामा 

जिल्ह्यात मटका, जुगारासह अवैध धंदे मोडित काढण्यात येत आहे. पोलिस अधीक्षकांनी तशा सूचनाही प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असे धंदे ज्याठिकाणी चालतात ते मोडितच काढले जातील. तसेच अशा धंद्यांना खतपाणी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिला.  

फुलारी हे गेल्या पाच दिवसांपासून सांगली जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी आले होते. त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांना भेटी देवून माहिती जाणून घेतली. तसेच प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेवून गुन्हेगारीचा आढावा ही त्यांनी घेतला. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

वाहतूक प्रश्‍नी आढावा घेतला असून योग्य त्या उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. हा वाहतूक प्रश्‍न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि बांधकाम विभाग असे एकत्रितपणे ॲक्शन प्लॅन आखणे गरजेचे आहे. तशा सूचना वाहतूक शाखेला देण्यात आल्या आहेत. यासाठी लवकरच बैठक घेतील असे त्यांनी सांगितले. 

फुलारी म्हणाले, गेल्या काही दिवसातील सांगली पोलिस दलाची कामगिरी समाधानकारक आहे. गांजासह दरोडा, चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. काही प्रलंबित गुन्हेही उघडकीस आणण्यासाठी एलसीबी निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. तसेच गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपार, मोका, हद्दपार, स्थानबद्ध सारख्या कारवाईही प्रभावीपणे करण्यात आल्या आहे. परंतू जिल्ह्यात चोरी, घरफोडी, चेनस्नॅचिंगचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत थोडेफार वाढल्याचे दिसते आहे. त्यासाठी गस्ती पथक, तपास यंत्रणांसह विविध उपाययोजना अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्या आहेत.  

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांना भेट देण्यात आली. त्याठिकाणच्या सुविधा आणि परिसर पाहुन प्रसन्न वाटले. नागरीकांसह तक्रारदारांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे. तसेच त्यांच्याशी पोलिसांनी सुसंवाद ठेवला पाहिजे, अशा सचूना दिल्याचे त्यांनी सांगितले.  शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्हीसह अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यावर भर दिला आहे. 

सांगलीत सुरू करण्यात आलेली आरएफआयडी यंत्रणा बंद असल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी ही यंत्रणा तत्काळ सुरू करण्यात यावी, असे अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना सांगितले. या यंत्रणेच्या माध्यमातून गस्तीला निघण्यापूर्वी संबंधित कर्मचारी ‘आरएफआयडी’द्वारे स्वत:चा अंगठा लावून गस्त सुरू करेल. त्यानंतर ठरवून दिलेल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पॉईंटवर प्रत्यक्ष जाऊन हजेरी नोंदवेल. त्यामुळे गस्तीपथकाचे ‘मिनिट टू मिनिट’चा प्रवास आणि गस्त नियंत्रण कक्षास समजली जाईल.  


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.