Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रेल्वे पोलिसात नोकरीच्या आमिषाने गंडा : सांगलीतील तिघांना अटक

रेल्वे पोलिसात नोकरीच्या आमिषाने गंडा : सांगलीतील तिघांना अटककोल्हापूर : खरा पंचनामा

रेल्वे पोलिसात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघा तरुणांना 18 लाखांना गंडा घातल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगलीतील तिघांवर कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उदय निळकंठ, गोविंद गुरव आणि नवनाथ गुरव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. श्रीधर शिवाजी शिंदे आणि दीपक जयसिंग अंगज अशी फसवणूक झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्या तीन संशयितांनी आणखी किती जणांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातला आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

उदय निळकंठ आधी उचगाव येथे राहण्यास होता. यावेळी त्याची दीपकचे वडील जयसिंग अंगज यांच्याशी ओळख झाली. यानंतर त्याने गोविंद गुरव आणि नवनाथ गुरव यांच्याशी ओळख करुन दिली. यानंतर सर्वांचे एकमेकांकडे येणे-जाणे होते. याच ओळखीचा फायदा घेत तिघानी दीपक अंगज आणि त्याचा मित्र श्रीधर शिंदे यांना रेल्वे पोलिसात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार दोघांनी जयसिंग अंगज यांनी 10 लाख रुपये आणि श्रीधर शिंदे याने 8 लाख रुपये आरोपींना दिले. 

मात्र दोन वर्ष उलटली तरी नोकरी लागली नाही. याबाबत आरोपींकडे वारंवार पाठपुरावा करुनही पैसेही परत मिळाले नाही आणि नोकरीही मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणांनी गांधीनगर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघाना सांगली जिल्ह्यातून अटक केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.