पैशांसाठी पतीने केला सतीश कौशिक यांचा खून : महिलेचा दावा
दिल्ली : खरा पंचनामा
चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांचे मंगळवार मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूप्रकरणी एका महिलेने खळबळजनक दावा केला आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीतीनुसार, महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तिच्या पतीने सतीश कौशिक यांचा 15 कोटी रुपयांसाठी खून केला आहे. दिल्ली पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये महिलेने हा दावा केला आहे. सतीश कौशिक दिलेले पैसे परत मागत होते, जे पती देऊ इच्छित नव्हते, असा आरोपही यावेळी त्या महिलेने केला आहे. कौशिकची हत्या पतीनेच औषध देऊन केली, असा आरोप महिलेने केला आहे.
शनिवारी, सतीश कौशिक यांच्या मृत्यूपूर्वी ज्या पार्टीत सहभागी झाले होते, त्या दिल्लीच्या फार्महाऊसमधून काही 'औषधे' जप्त केली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीची प्रत पाहिल्यानंतर आयएएनएस वृत्तसंस्थने तिच्याशी संवाद साधला.
तिने हा पूर्वनियोजित खून असल्याचाही आरोप केला आहे. तिने 13 मार्च 2019 रोजी त्या व्यावसायिकाशी लग्न केले. त्यानेच सतीश कौशिक यांच्याशी तिची ओळख करून दिली होती. सतीश कौशिक तिला भारत आणि दुबईमध्ये नियमित भेटत असे असंही तिने यावेळी सांगितले आहे.
तर 23 ऑगस्ट 2022 रोजी सतीश कौशिक दुबईतील तिच्या घरी आले होते. त्यांनी तिच्या पतीकडे 15 कोटी रुपयांची मागणी केली. तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, "मी ड्रॉईंग रूममध्ये हजर होते जिथे कौशिक आणि माझे पती दोघांमध्ये वाद झाला.
कौशिक म्हणत होते की मला पैशाची नितांत गरज आहे. पैसे देऊन तीन वर्षे झाली आहेत. कौशिक यांनी गुंतवणुकीसाठी माझ्या पतीला 15 कोटी रुपये दिले होते. मात्र, कौशिक म्हणत होते, की कोणतीही गुंतवणूक केली नाही किंवा त्यांचे पैसेही परत दिले नाहीत, त्यामुळे त्यांची फसवणूक केल्याचे ते बोलत होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.