Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सीआरपीएफच्या महासंचालक

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सीआरपीएफच्या महासंचालकमुंबई : खरा पंचनामा

केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सशस्त्र सीमा दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी गुरुवारी बढती देण्यात आली. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने जारी केला. 

शुक्ला यांच्याकडे ही जबाबदारी ३० जून २०२४ पर्यंत असणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप झाला होता. केंद्रावर प्रतिनियुक्तीवर असलेल्या शुक्ला ८ फेब्रुवारी, २०२१ पासून केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) अतिरिक्त संचालकपदी कार्यरत होत्या. त्यांना नुकतीच महासंचालकपदी बढती देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सशस्त्र सीमादलाच्या महासंचालकपदी नियुक्ती देण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.