Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खबऱ्याला धमकवणारा, वरिष्ठांबद्दल अपशब्द वापरणारा पोलिस निलंबित

खबऱ्याला धमकवणारा, वरिष्ठांबद्दल अपशब्द वापरणारा पोलिस निलंबित



पुणे : खरा पंचनामा

गुन्हेगार तसेच चोरट्यांची माहिती देणाऱ्या एका खबऱ्याला धमकावणे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत पाठिमागे अपशब्द वापरल्यावरून गुन्हे शाखेतील एका पोलीस हवालदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत. 

दीपक शिवराम लांडगे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. लांडगे हे गुन्हे शाखा युनिट पाच येथे कर्तव्यावर नेमणुकीस आहेत. खबऱ्याने आरोपीबाबतची माहिती त्यांच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या युनिटमधील कर्मचाऱ्याला दिली. त्यामुळे लांडगे यांनी संबंधित खबऱ्याला विचारणा करून शिवीगाळ करीत धमकावले. तसेच अधिकाऱ्यांबाबत अर्वाच्य भाषेचा वापर केला. 

लांडगे यांनी केलेल्या वर्तनामुळे पोलीस कर्मचारी व सामान्य जनतेत चुकीचा संदेश गेल्यामुळे तसेच अशोभनीय वर्तन केल्याचा ठपका ठेवत लांडगे यांना खात्यातून निलंबित केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.