आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा
नाशिक : खरा पंचनामा
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे. दरम्यान 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आमदार कडू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नाशिक महापालिका आयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. या प्रकरणात बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी 2017 मध्ये आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेत आंदोलन केलं होते. आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांवर हात उगारला होता.
दरम्यान प्रहारच्या माध्यमातून नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, याबाबत आंदोलन सुरु होते. यावेळी प्रहारच्या शिष्टमंडळाकडून तत्कालीन आयुक्तांची भेट घेण्यात आली होती. यावेळी आमदार बच्चू कडू आणि तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात चकमक झाली होती. सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. दरम्यान याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक अशी 2 वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.