Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमृता देवेंद्र फडणवीस तक्रार प्रकरणात नवा ट्विस्ट

अमृता देवेंद्र फडणवीस तक्रार प्रकरणात नवा ट्विस्टमुंबई : खरा पंचनामा

अमृता देवेंद्र फडणवीस यांना लाच आणि खंडणी देण्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानी हिने जबाबत आपण फॅशन डिझायनर नसल्याचे म्हटल्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मी केवळ एक कायद्याची विद्यार्थिनी आहे. चौकशीमध्ये वेगवेगळी माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

फॅशन डिझायनर नसताना ती नेमकी कोणती ओळख सांगून अमृता देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली आणि एवढी वर्ष संपर्कात कशासाठी होती? याचा तपास पोलिस करत आहेत.

फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षा हिने जवळीक मिळवत गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी मदतीची मागणी केली होती. याबदल्यात बुकींकडून सट्ट्यातून मिळणारे पैसे तसेच मदत करण्यासाठी एक कोटी रुपये देऊ केले होते. बनावट ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप पाठवन त्याआधारे ब्लॅकमेल करत दहा कोटींची खंडणी मागितली, असा आरोप करीत अमृता देवेंद्र फडणवीस यांनी मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रथम अनिक्षा आणि नंतर तिचे वडील अनिल जयसिंघानी याला गुजरामधून अटक केली. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. दोघांची याप्रकरणात समोरासमोर बसून चौकशी केली जात आहे.

अनिक्षा आपला जबाब वारंवार बदलत असून आपण फॅशन डिझायनर नसल्याचे तिने म्हटले आहे. पण, तिच्या घरी पोलिसांनी काही ड्रेस आणि ज्वेलरी सापडली आहे. कायद्याची विद्यार्थिनी असल्याचे सांगणाऱ्या अनिक्षा हिने महागडे ड्रेस आणि ज्वेलरी कशासाठी आणली याचा तपास पोलिस करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.