Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साई रिसॉर्टप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांना ईडीकडून अटक

साई रिसॉर्टप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांना ईडीकडून अटक



मुंबई : खरा पंचनामा

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील  साई रिसॉर्ट प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ईडीच्या या कारवाईमुळे महसूल विभागात  खळखळ उडाली आहे.

जयराम देशपांडे हे दापोलीतील तत्कालीन प्रांताधिकारी आहेत. ईडीने अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने चार दिवसांपूर्वीच उद्योजक सदानंद कदम यांना अटक केली होती.

चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे धाकटे बंधू आहेत तसेच ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. 

उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेसाठी सदानंद कदम यांनी मोठी ताकद लावल्याची चर्चा होती. सभा झाल्यानंतर संजय कदम यांना ईडीने अटक केली होती.

दरम्यान, सदानंद कदम यांच्यानंतर आता ईडीने या प्रकरणात तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना सुद्धा ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती. पदावर असताना अनियमितता आरोपाखाली देशपांडे यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

किरीट सोमय्या सगळ्यांना उद्धवस्त करण्यासाठीच बसले आहेत. साई रिसॉर्टशी माझा राजकीय संबंध जोडून मला राजकीय बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तो राजकीय खेळीचा भाग आहे. पण अन्य ज्यांची काही घरं आहेत, काही लोकांची छोटी छोटी स्टक्चर आहेत. तीही यात उध्वस्त होती, यांची जबाबदारी किरीट सोमय्या घेणार का? असा सवाल परब यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.