Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजप नेत्याचा पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न

भाजप नेत्याचा पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न कानपूर : खरा पंचनामा 

उत्तरप्रदेशातील कानपूर येथील भाजप नेते गुरविंदर सिंग छाबरा आणि त्यांची पत्नी परमजीत यांनी गुरुवारी घरगुती वादातून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या. सध्या त्यांच्यावर सर्वोदयनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

कानपूर येथील गुरविंदरसिंग छाबरा फाजलगंजमधील चेन फॅक्टरी स्क्वेअरजवळील एका अपार्टमेंटमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. गुरविंदर सिंगचा मोठा भाऊ टोनी छाबरा याने सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. याचा राग येऊन परमजीतने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. पत्नीला बेशुद्ध अवस्थेत पाहून गुरविंदरने तिला कारमधून हॉस्पिटलमध्ये नेले. पत्नीला दाखल करून घेतल्यानंतर तो स्वतः ही बेशुद्ध पडला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. 

गुरविंदर आणि त्यांच्या पत्नीच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची माहिती मिळताच शीख समाज आणि शहरातील भाजप नेत्यांनी रुग्णालयात धाव घेऊन दोघांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विकीने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा लोकांमध्ये होती. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनीही रुग्णालयात पोहोचून दोघांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.