Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुन्हा मागे घेण्यासाठी तक्रारदारावर दबाव, त्रास : महिला उपनिरीक्षकाविरोधात तक्रारीचे पत्र

गुन्हा मागे घेण्यासाठी तक्रारदारावर दबाव, त्रास : महिला उपनिरीक्षकाविरोधात तक्रारीचे पत्र



नाशिक : खरा पंचनामा

नाशिकच्या दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट यांच्या विरोधात एका हॉटेल व्यावसायिकाने थेट पोलिस अधीक्षक  आणि पोलीस महानिरीक्षकांना पत्र दिले आहे. या पत्रात तक्रारदाराने पोलीस उपनिरीक्षक असलेल्या महिला अधिकारी मोनिका जेजोट यांच्याविरोधात तक्रार केलेली आहे. 

नाशिकच्या दिंडोरी येथे 20 वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करत असलेल्या व्यक्तीने दिंडोरी पोलिस ठाण्यात एक चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये एका महिलेवर संशय असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र त्या गुन्ह्यात असलेली संबंधित व्यक्ती आणि महिला पोलिस अधिकारी यांच्यात चांगलाच परिचय आहे. त्यामुळे जाणीव पूर्वक त्रास दिल्याचे तक्रारदाराने पत्रात म्हटले आहे.

दिंडोरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट या तक्रारदार हॉटेल व्यावसायिक यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना रात्री 11 वाजता पोलिस ठाण्यात बोलवितात. आणि रात्री 2 वाजेपर्यंत बसवून ठेवतात. त्यामुळे मानसिक त्रास देऊन गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणतात असे पत्रात म्हटले आहे.

तक्रारदार हॉटेल व्यावसायिकासह त्यांचे मेव्हणे आणि नातेवाईकांना मानसिक त्रास दिला जात आहे. माझ्यावर गुन्हा दाखल नसून त्या प्रकरणी संशयित व्यक्तीना पाठीशी घालून आमच्यावर अन्याय होत असल्याने आपल्याकडे तक्रार करीत असल्याचे म्हंटले आहे.

यापूर्वी दोन वेळेस चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हेच गुन्हे मागे घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक मोनिका जो दबाव टाकत असून मानसिक अत्याचार आणि अन्याय होत असल्याची तक्रार केली गेल्याने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण पोलिस अधिक्षकांकडे गेल्याने जोरदार चर्चा होत आहे.

पोलिस अधिक्षक शहाजी उमप यांच्यासह हे पत्र पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी काय दखल घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.