Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पतीची न्यायालयाने केली दोन पत्नींमध्ये वाटणी!

पतीची न्यायालयाने केली दोन पत्नींमध्ये वाटणी!



ग्वाल्हेर : खरा पंचनामा

दोन पत्नीच्या पतीच्या वाटणीचं एक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेर जिल्ह्यातलं आहे. येथील एका व्यक्तीच्या दोन पत्नी आहेत. या दोन्ही बायका थेट न्यायालयात पोहोचल्या होत्या. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणी सुनावणी केली आणि दोन्ही पत्नींमध्ये पतीच्या वाटणीचा निर्णय दिला आहे.

दोन बायकांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर या प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायाधीशांनी या प्रकरणावर तोडगा काढला आहे. न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर आता हा पती आठवड्यातले तीन दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहाणार आहे. तर रविवारी काय करायचं हे ठरवण्याचा अधिका पतीला देण्यात आला आहे.

हा तरुण हरियाणामधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता आहे. त्याचं पहिलं लग्न २०१८ मध्ये झालं होतं. लग्नानंतर पती-पत्नी एकत्र राहात होते. परंतु २०२० मध्ये कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागला. त्यावेळी पती-पत्नी त्यांच्या घरी ग्वाल्हेरला परतले. लॉकडाऊन हटवल्यानंतर पती हरियाणाला गेला तर पत्नी ग्वाल्हेरलाच राहिली. 

त्यानंतर या तरुणाची त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेशी जवळीक वाढली. काही दिवसांनी युवकाने या महिलेशी लग्न केलं. दरम्यान, नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती पहिल्या पत्नीला मिळाल्यानंतर तिने मोठा गोंधळ घातला. त्यानंतर तिने थेट ग्वाल्हेर कुटुंब न्यायालयात धाव घेतली. सुनावणीच्या वेळी न्यायालयाने नवरा आणि त्याच्या दोन्ही पत्नींमध्ये मध्यस्थी करून हे प्रकरण निकाली काढलं.

कोर्टाच्या मध्यस्थीनंतर नवरा त्याच्या दोन्ही बायकांना प्रत्येकी एक-एक फ्लॅट देईल. या फ्लॅटमध्ये दोन्ही बायका राहातील. पहिल्या पत्नीसोबत तीन आणि दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस राहील. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी काय करायचं हे तो स्वतः ठरवेल. कोर्टाचा हा तोडगा तिघांनी मान्य केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.