Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेतकऱ्यांच्या नापिकी जमिनी शासन भाड्याने घेणार : फडणवीस

शेतकऱ्यांच्या नापिकी जमिनी शासन भाड्याने घेणार : फडणवीस



मुंबई : खरा पंचनामा

सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसं काही पीकत नसले तर ती शेती ३० वर्ष भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे. शेतीची मालकी तुमची असणार आहे. वर्षाला ७५ हजार रुपये भाडं देण्यात येईल. इतकेच नव्हे तर दरवर्षी २ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल. तसेच १ एकरमागे ७५ हजार रुपये देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं.

पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी जमीन नापिक होण्यावर खंत व्यक्त केली आहे. केमीकलच्या वापरामुळे काळ्या आईची रोग प्रतिकारशक्ती कमी झालीय. त्यामुळे महाराष्ट्र आणि भारत हळू हळू कॅन्सर कॅपटील होत आहे. कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावं लागेल. पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विषमुक्त शेतीली सुरुवात केली आहे. त्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. जवळपास यावर ३ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे. यातून आपली उत्पदक्ता वाढेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी योजना सुरु केली. केंद्रासह राज्य सरकारदेखील शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये टाकणार आहे. विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही. जवळपास दीडलाख शेतकऱ्यांना शेततळे दिले. ही एक यशस्वी योजना झाली.

पेरणी यंत्र अशा सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना देण्यासाठी १ हजार कोट रुपये राखून ठेवले आहेत. सर्वांना याचा फायदा देणार आहोत. गट शेती हा महत्त्वाच पर्याय आहे. गट शेतीमुळे मोठ्या प्रमाणात नव्या गोष्टी वापरण्याची क्षमता निर्माण झाली. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यात येणार आहे. जितके ॲग्रीकल्चर फीडर आहेत. हे सगळे सोलरवर चालवण्यात येणार आहेत. हे फीडर सोलरवर आणण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यात येणार हे काम यंदाच्या वर्षी सुरु करण्यात येत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.