Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुचाकींच्या समोरा-समोर धडकेत दोन तरुण ठार

दुचाकींच्या समोरा-समोर धडकेत दोन तरुण ठार



सातारा : खरा पंचनामा

साताऱ्यातील लोणंद महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 

स्वराज स्वरूप कुमार जानकर (वय २४, रा. पाडेगाव ता. खंडाळा), सुप्रीम सुभाष शिंदे (वय २४, रा. बलवडी ता. सांगोला) अशी मृतांची नावे आहेत. सातारा-लोणंद महामार्गावरील पिंपोडे खुर्दजवळ हा अपघात झाला. तेथील एका ढाब्याजवळ या दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास स्वराज जानकर हा बुलेटवरून साताऱ्याहून लोणंदच्या दिशेने जात होता आणि सुप्रीम शिंदे हा त्याच्या दुचाकीवरून साताऱ्याच्या दिशेला जात होता. दरम्यान पिंपोडे खुर्द गावच्या हद्दीतील कोरेगाव फाट्याजवळ या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

दोन्ही दुचाकींचा हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात वाठार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथे पाठवण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.