Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खुनात फाशी झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने सोडले निर्दोष

खुनात फाशी झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने सोडले निर्दोष



पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील एका खून प्रकरणात फाशी झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. शिक्षा झालेल्याने घटना घडली तेव्हा आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. पुणे न्यायालयाने त्याच्या वयाची तपासणी केल्यानंतर घटनेवेळी तो अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सवोर्च्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. मात्र त्याला २८ वर्षे या खून प्रकरणात कारागृहात काढावी लागली. 

नारायण चेतनराम चौधरी असे निर्दोष सोडण्यात आलेल्याचे नाव आहे. तो मूळचा राजस्थान येथील आहे. पुण्यात १९९४ मध्ये एका गर्भवती महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून करण्यात आला होता. त्याप्रकरणी चौधरीसह जितेंद्र गहलोत आणि एकास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या खटल्याच्या सुनावणीवेळी चौधऱी याने खुनाची घटना घडली तेव्हा आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र न्यायालयाने त्याला सज्ञान समजून यातील तीनही संशयितांना फाशीची शिक्षा सुनावली होती. 

त्यानंतर त्यानंतर चौधरी आणि गहलोत यांनी राष्ट्रपतींकडे शिक्षेविरोधात दयेचा अर्ज दाखल केला होता. नंतर चौधरी याने तो अर्ज मागे घेतला होता. नंतर त्याने सवोर्च्च न्यायालयात रिव्ह्यू पिटीशन दाखल केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यातील सत्य शोधण्याचे अदेश दिले होते. पुण्यातील न्यायालयाच्या तपासणीत त्याचे राजस्थान येथील एका शाळेचे प्रमाणपत्र सापडले. त्यावरून त्याचे वय निश्चीत झाले. त्यानंतर पुणे न्यायालयाने त्यांचा सीलबंद अहवाल २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दिला होता. 

पुणे न्यायालयाच्या अहवालात त्याचे वय निश्चीत झाले होते. तसेच खुनाच्या घटनेवेळी तो १२ वर्षांचा होता हेही स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज त्याची निर्दोष मुक्तता केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.