Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रॅक्टरची रिक्षाला धडक : एकाच कुटुंबातील तिघे ठार

ट्रॅक्टरची रिक्षाला धडक : एकाच कुटुंबातील तिघे ठारकराड : खरा पंचनामा

येणपे (ता. कराड, जि. सातारा) गावाजवळील लोहारवाडी परिसरात रिक्षा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह एक मुलगी असे तिघेजण जागीच ठार झाले तर मुलगा जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.

सुरेश सखाराम म्हारुगडे (वय 39), सुवर्णा सुरेश म्हारुगडे (34), समिक्षा सुरेश म्हारुगडे (13) अशी मृतांची नावे असून समर्थ सुरेश म्हारुगडे (17) जखमी झाला आहे. म्हारुगडे कुटुंबीय पुण्यावरुन यात्रेसाठी पणूंद्रे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) कडे रिक्षाने निघाले होते. सकाळी दहाच्या सुमारास येणपे गावाजवळील लोहारवाडी परिसरात आल्यावर रिक्षा आणि कराडकडे निघालेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. त्यामध्ये रिक्षाचा पूर्ण भाग दबला गेला. त्यामुळं रिक्षातील सर्वजण अडकले होते. 

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तिथं धाव घेवून रिक्षात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.