Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष : 10 गंभीर जखमी

काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष : 10 गंभीर जखमीबेंगळुरु : खरा पंचनामा

कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील कोडेकल गावात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामध्ये 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीच हा संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे मतदान होइपर्यंत संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण राहील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुरुवारी दुपारी काँग्रेस नेते राजवेंकटप्पा नायक त्यांच्या समर्थकांसह मतदारसंघातील जत्रेत सहभागी होण्यासाठी 80 वाहनांच्या ताफ्यातून जात असताना ही घटना घडली. त्यावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला, त्यामुळं दोन्ही बाजूंनी जोरदार खडाजंगी झाली.

काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जमावाला पांगवलं. या हिंसक संघर्षानंतर यादगीर जिल्ह्यातील सुरपुरा मतदारसंघात 8 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलंय. याप्रकरणी 4 तक्रारीनंतर 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.