Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

20 हजारांची लाच मगितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास अटक

20 हजारांची लाच मगितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास अटक 



पुणे : खरा पंचनामा 

बदली चालकाने परस्पर कर्नाटकात नेलेली कार परत मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. लाच मगितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. 

शशिकांत नारायण पवार असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सध्या ते सिंहगड पोलीस ठाण्याअंतर्गत अभिरुची पोलीस चौकीमध्ये कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या मालकीची मारुती कार त्यांचा बदली चालक परस्पर घेऊन कर्नाटकात गेला होता. हे वाहन परत मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी शशिकांत पवार याच्याकडे आली होती. 

ती कार परत मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून पवार याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. २५ जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळण तेव्हा तडजोडीत २० हजार रुपये घेण्याची तयारी पवार याने दर्शविली. लाचेची मागणी करण्यात करण्यात आली. 

२५ जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली. तेव्हा तडजोडीत २० हजार रुपये घेण्याची तयारी पवार याने दर्शविली. लाचेची मागणी करण्यात आली असल्याने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.