करंजे येथे 3 हजारांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक
सांगली : खरा पंचनामा
सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना करंजे (ता. खानापूर) येथील मंडल अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. तर लाच मगितल्याप्रकरणी तलाठ्यावर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी ही कारवाई केली.
मंडल अधिकारी शशिकांत ज्ञानदेव ओमासे (वय ४६) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर तलाठी विजय शंकर ओमासे (वय ३६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे वडील यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीबाबत विट्यातील प्रांत कार्यालय व सांगली दिवाणी न्यायालय येथे दावा दाखल होता. या दाव्याचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने लागला. त्या निकालपत्रानुसार सातबाऱ्यावर तक्रारदार यांच्या वडीलांचे नाव नोंद करण्यासाठी करंजे तलाठी कार्यालय येथे अर्ज दिला होता. त्याची सातबाऱ्यावर नोंद घेवून मंजूर करण्या करीता मंडल अधिकारी करंजे ओमासे यांनी स्वतः करीता व तलाठी विजय ओमासे यांचेकरीता तक्रारदार यांचेकडे 5 हजार रूपये लाच मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार अर्ज दिला होता. तक्रारीनुसार ब्युरोच्या प्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता मंडल अधिकारी ओमासे यांनी स्वतः करीता व तलाठी विजय ओमासे यांचेकरीता 5 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3 हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मंडल अधिकारी ओमासे यांचेविरूध्द करंजे येथे सापळा लावला. त्यावेळी त्यांना 3 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी मंडल अधिकारी ओमासे, तलाठी विजय ओमासे यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, सलिम मकानदार, उमेश जाधव, पोपट पाटील, हरीभाऊ वाघमोडे, रविंद्र धुमाळ, सिमा माने, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, चालक अनिस वंटमुरे यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.