लष्करी तळावरील गोळीबारात 4 जण ठार
भटिंडा : खरा पंचनामा
पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी तळावर गोळीबार झाला आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. लष्करी तळावर हा हल्ला झालाय की सैन्यातल्याच कोणीतरी हा हल्ला केल्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीय. या हल्ल्यानंतर शीघ्र कृती दलाने परिसराचा ताबा घेतला असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. याचबरोबर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.
भटिंडाचे लष्करी तळ हे खूप जुने आहे. पूर्वी ते शहराच्या ते बाहेर होते. परंतू, जसजसा शहराचा विस्तार होत गेला आता ते शहरात आले आहे. कोणत्याही सामान्य वाहनाद्वारे या तळाबाहेरपर्यंत जाता येते. परंतू, कडक सुरक्षा असल्याने बाहेरील व्यक्ती आत घुसू शकत नाही.
पहाटे साडे चारच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. ऑफिसर्स मेसमध्ये हा गोळीबार झाला आहे. यामुळे सैन्य अधिकाऱ्यांतील आपापसातील वादातून हा प्रकार झाल्याचा अंदाज लावला जात आहे. सध्या गोळीबार थांबला असून काही वेळापर्यंत गोळीबार सुरु होता, असे सांगण्यात आले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.