Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आमदार जपानला रवाना?

राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आमदार जपानला रवाना?



मुंबई : खरा पंचनामा

गेल्या काही दिवसांपासुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकिय वातावरण ढवळून निघाले होते. तर आता राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत अजित पवार बंड करणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्त संकेतस्थळाने दिले आहे. शिवाय राष्ट्रवादीचे पाच आमदार जपानला गेल्याचेही समजते आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

योग्यवेळ आल्यावर ४० आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजपसह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी अजित पवार अस्वस्थ असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

आता 5 आमदार जपानला गेल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पुन्हा चर्चाना उधाण आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.