Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जत विजय ताड खून प्रकरण : माजी नगरसेवक उमेश सावंतची माहिती देणाऱ्यास बक्षीस सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांची माहिती

जत विजय ताड खून प्रकरण : माजी नगरसेवक उमेश सावंतची माहिती देणाऱ्यास बक्षीस
सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांची माहिती 




सांगली : खरा पंचनामा

जत येथील माजी नगरसेवक विजय ताड याच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उमेश जयसिंगराव सावंत याची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. दरम्यान या खूनप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, दोन जादा मॅगझीन, सहा पुंगळ्या, दोन दुचाकी, दोन एअरगन असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

दि. १७ मार्च रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास मृत विजय ताड मुलांना शाळेतून आणण्यासाठी इनोव्हा (एमएच १० सीएन ०००२) मधून गेले होते. त्यावेळी बबलू ऊर्फ संदीप चव्हाण याच्यासह त्याच्या साथीदारांनी ताड यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी ताड पळून जात असताना त्यांच्यावर गोळीबार करत शाळेजवळील मोकळ्या जागेत ते खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला होता. 

ताड यांच्या खूनप्रकरणी बबलू ऊर्फ संदीप चव्हाण, निकेश ऊर्फ दाद्या मदने, आकाश व्हनखंडे, किरण चव्हाण या चौघांना कर्नाटकातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी माजी नगरसेवक उमेश सावंत यांच्या सांगण्यावरून तसेच चिथावणीवरून केल्याची कबुली चौघांनाही दिली आहे. दरम्यान खून झाल्यापासून माजी नगरसेवक उमेश सावंत पसार झाला आहे. 

उमेश सावंत याच्या ठावठिकाण्याची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.