Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाटक विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमाभागात कडक बंदोबस्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचना

कर्नाटक विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमाभागात कडक बंदोबस्त
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचनासांगली : खरा पंचनामा

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या सीमांना लागून असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक रस्त्यांवर पोलिसांचा चोवीस तास वॉच असणार आहे. रात्रगस्त आणि नाकाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी मिळवून त्यांच्या हालचालीवरही वॉच ठेवण्याच्या सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना त्याची सविस्तर माहिती दिली. 

कर्नाटकला लागून असलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना श्री. फुलारी यांनी दिल्या आहेत. सीमेलगतच्या तपासणी नाक्यांवर योग्य त्या प्रमाणात बंदोबस्त नियुक्त करून त्याची त्या भागातील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी खात्री तसेच तपासणी करावी. पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तसेच उपअधीक्षक यांनी नाकाबंदी आणि तपासणी नाक्यांना वेळोवेळी भेटी देऊन मतदारांना प्रलोभन देण्यासाठी अवैध दारू, रोख रक्कम तसेच इतर वस्तू जाणार नाहीत याची तपासणी करावी अशा सूचना श्री. फुलारी यांनी दिल्या आहेत. 

कर्नाटक लागत असलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रांतून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व इतर रस्ते या परिसरात सक्तीची रात्रगस्त तसेच प्रभावी नाकाबंदी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांशी समन्वय ठेवून गोवा बनावटीच्या तसेच गावठी दारूच्या जास्तीत जास्त केसेस कराव्यात. आर्म अक्ट, अवैध गुटखा वाहतूक तसेच इतर अवैध व्यवसायांवर छापे मारून जास्तीत जास्त केसेस कराव्यात अशाही सूचना श्री. फुलारी यांनी परिक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

गोवंश मांस वाहतूक करणारी वाहने तपासून कारवाई करावी. समन्स, बेलेबल वॉरंट, नॉन बेलेबल वॉरंट विशेषतः कर्नाटकातून प्राप्त बजावणी जास्तीत जास्त प्रमाणात पूर्ण करावी. कर्नाटकातील फरारी गुन्हेगार, गुंड यांच्या याद्या प्राप्त करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशाही सूचना महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी दिल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.