Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द : चर्चाना उधाण

अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द : चर्चाना उधाण 



मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असतानाच आता आणखी एका बातमीने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे दोन मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत. या घटनेमुळे चर्चाना उधाण आले आहे. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही नेते अमित शाहांना भेटणार असल्याची माहिती आहे. 

दरम्यान अजित पवार यांनी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता. परंतु ते अद्याप मुंबईतच असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.