Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करा : न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करा : न्यायालयाचे आदेश



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची वेळ आली आहे. कुरुंदवाडमधील जमिन वादाच्या प्रकरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं गेल्यानं न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

१९८४ पासून हा खटला चालू होता. कुरुंदवाडमधील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा वाद सुरू होता. यामध्ये कुरुंदवाड मधील वसंत संकपाळ यांची जमीन जिल्हा प्रशासनाने रस्त्यासाठी घेतली होती.

जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने 1984 पासून खटला चालू होता. प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश काढले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकारी आणि वकील दाखल झाले आहेत. न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.