Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटकन्यूयार्क : वृत्तसंस्था

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमधील मैनहैटन कोर्टात हजर झालेत. कोर्टात हजर होताच ट्रम्प यांना पोलीसांनी अटक केली आहे. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर अॅडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे. यासह ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत ज्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

ट्रम्प 'यांच्यावर फसवणुकीच्या 30 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. यातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याचा आरोप आहे. 2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण पॉर्न स्टारशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्याचा आरोप आहे. येथे मुद्दा पैसे देण्याचा नसून कोणत्या माध्यमातून पैसे देण्यात आले आहे त्यासंदर्भात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी गुप्तपणे डॅनियल्सला पैसे दिले. त्यानंतर ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना या काळात झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली. ट्रम्प हे 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.