Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तब्बल चार दिवसांनी गुन्हा दाखल मिरजेतील रेल्वे स्थानक परिसरातील गर्दुल्यांवर पोलिसांचा अंकुश नाहीच

मिरजेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तब्बल चार दिवसांनी गुन्हा दाखल
मिरजेतील रेल्वे स्थानक परिसरातील गर्दुल्यांवर पोलिसांचा अंकुश नाहीच



सांगली : खरा पंचनामा

मिरजेतील कोल्हापूर रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाखाली आईसोबत झोपलेल्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. रविवारी रात्री आठ ते सोमवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी आज तब्बल चार दिवसांनी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मिरजेतील अवैध व्यवसाय आणि गर्दुल्ले यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी मिरज रेल्वे स्थानक परिसरातील गदुर्ल्यांवर अंकुश नसल्याने अशा घटना घडत असल्याची जोरदार चर्चा आहे. 

पीडित मुलगी रविवारी रात्री मिरज-कोल्हापूर रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाखाली आईसोबत झोपली होती. त्यावेळी अज्ञातांनी त्या मुलीचे अपहरण केले. तिच्यावर क्रुरपणे अत्याचार करण्यात आले. सोमवारी पहाटेपयर्त नराधम तिच्यावर अत्याचार करत होता. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीची आई तिला घेऊन तिच्या मूळ गावी गेली. तेथे तिला त्रास होत असल्याने मुलीला तेथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील स्थानिक पोलिसांनी याची नोंद घेतली. त्यानंतर त्याबाबत मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. त्यानुसार घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवसांनी याबाबतचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुधीर भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, घटना घडल्यानंतर मुलीला घेऊन तिची आई तिच्या गावी निघून गेली. त्यांनी आमच्याकडे तक्रारच दाखल केली नाही. त्यांनी मुलीला उपचारासाठी दाखल केल्यानंतर तेथील पोलिसांनी घेतलेल्या नोंदीच्या आधारे आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अज्ञात असले तरी आम्ही त्यांच्या मागावर आहोत. लवकरच या गुन्ह्यातील संशयितांना अटक करू असे भालेराव यांनी खरा पंचनामाशी बोलताना सांगितले. 

मिरजेत पोलिसांचा वचकच राहिला नाही!
मिरज शहरात दोन पोलिस ठाणी आहेत. महात्मा गांधी पोलिस ठाण्याच्या अखत्यारित रेल्वे स्टेशन येते. गेल्या काही महिन्यांपासून मिरजेतील पोलिसांचा या भागात वचकच राहिला नसल्याचे दिसून येते. गर्दुल्ले आणि नशेखोर लोकांनी मिरज रेल्वे स्थानकाला अड्डा बनवले आहे. या परिसरात अजूनही अनेक अवैध व्यवसाय चालतात. यापूर्वी गर्दुल्यांसह अंमली पदाथर् विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. अलिकडील काळात अशी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच अशी घटना घडल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिरजेतील पोलिसांनी गेल्य चार ते पाच महिन्यांत अंमली पदार्थ, अवैध व्यवसायांवर किती कारवाई केली असे प्रश्नही आता मिरजकर विचारत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.