Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बंदुकीतून कर्मचाऱ्याकडून सुटली गोळी!

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बंदुकीतून कर्मचाऱ्याकडून सुटली गोळी! 



नांदेड : खरा पंचनामा 

वरिष्ठ अधिकाऱ्यांची बंदूक हाताळण्याचा प्रयत्न करत असताना कर्मचाऱ्याच्या हातून बंदुकीचा ट्रिगर अचानक दबला गेला आणि बंदूकीतून सुटलेली गोळी जमिनीला लागली. बुधवारी सकाळी नांदेड कारागृह परिसरात ही घटना घडली. गोळीबाराच्या घटनेमुळे कारागृहासह परिसरात खळबळ उडाली होती. 

कारागृहात असलेल्या कैद्यांना न्यायालयात हजर करण्याचे काम मुख्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत असतात. कैद्यांना न्यायालयात नेण्यापासून त्यांना पुन्हा कारागृहात आणण्याची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची असते. 

बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक के. एच. आरेवार संशयितांना न्यायालयात हजर करण्यासाठी कागृहात आले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा राईटर होता. कारागृहात जात असताना बंदूक नेण्याची परवानगी नसल्याने आरेवार यांनी त्यांची बंदूक राईटर यांच्याकडे दिली. त्यानंतर त्याने ही बंदूक घेऊन हाताळण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान बंदूकीचा ट्रिगर दाबला गेला आणि बंदूकीतून गोळी सुटली. ती गोळी जमिनीला लागली. सुदैवाने ही गोळी जमिनीला लागल्याने मोठा अनर्थ टळला. 

घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक आरेवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लेखी जबाब दिला. पोलीस कर्मचारी यांच्या हातून चुकीने हा गोळीबार झाल्याचे आरेवार यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरु आहे


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.