Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्नीच्या चारित्र्यावर संशयाने मुलीचा खून करून वडिलांची आत्महत्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशयाने मुलीचा खून करून वडिलांची आत्महत्या



मुंबई : खरा पंचनामा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता म्हणून एका बापाने 11 वर्षांच्या मुलीचा खून करून बापाने आत्महत्या केली. मुंबईच्या लालबाग परिसरात ही घटना घडली आहे. भूपेश पवार असं मृत बापाचं नाव आहे. तर आर्या पवार असे मृत मुलीचे नाव आहे.

भूपेश पवार याला कायम आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. मंगळवारी पत्नी बाहेर गेली असता, भुपेशने आपल्या 11 वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरुन काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मृत भूपेश पवार (वय 42 वर्षे) हा शेअर ब्रोकर म्हणून काम करत होता. तर त्याची पत्नी एका खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून काम करते. गणेश गल्लीतील विमावाला महल या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर पती, पत्नी आणि मुलगी राहत होते. काल नेहमीप्रमाणे पत्नी कामावर गेली. परंतु सकाळी अकराच्या सुमारास तिने पती भूपेश पवारला अनेक फोन केले. परंतु त्याने एकही कॉल रिसिव्ह केला नाही. संशयास्पद वाटल्याने पत्नीने घराकडे धाव घेतली. घरचा दरवाजा आतून बंद होता. यानंतर तिने शेजाऱ्यांना कळवलं आणि काळाचौकी पोलीस स्टेशन गाढलं. यानंतर दरवाजा तोडल्यानंतर त्यांना भूपेश पवार आणि आणि मुलगी दोघेही लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी दोघांना केईएम रुग्णालयात दाखल केलं असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान पोलिसांना त्याच्या घरात सुसाईड नोट देखील सापडली आहे. यात त्याने लिहिलं आहे की, पत्नीसोबत झालेल्या वादामुळे त्याने हे पाऊल उचलले आहे. आपल्यानंतर मुलीची फरफट होऊ नये असंही त्याने लिहिलं आहे. तसंच माझा पैसा, सोनं आणि घर माझ्या भाच्याला द्यावं असे चिठ्ठीत म्हटले आहे. भूपेश पवार याने आत्महत्या करण्यापूर्वी घरातील 9 ते 10 तोळं सोनं आणि 9 लाख रुपयांची रोख रक्कम काढून जमिनीवर ठेवली होती. सुसाईड नोटमध्ये हा ऐवज आपल्या भाच्याला देण्याचा उल्लेख केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.