Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी बाहेरून पाठींबा देण्याची तयारी होती!

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी बाहेरून पाठींबा देण्याची तयारी होती!





मुंबई : खरा पंचनामा

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. अशोक चव्हाण एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मविआ सरकार कोसळत होतं त्यावेळीचा एक किस्सा सांगितला ते म्हणाले, ज्यावेळ सरकार कोसळत होतं, त्यावेळी काही लोकांनी उल्लेख केला की काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेना सोडून चाललो आहे, त्यानंतर उद्धवजी राजीनामा देण्यासाठी जात होते त्यावेळी मी त्यांना सांगितलं आमची भूमिका स्पष्ट आहे.

जर आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेस पक्ष तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल पण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिलं पाहिजे, तुम्ही तुमचा कार्यकाळ पाच वर्ष पुर्ण केला पाहिजे, अशी माहिती त्यांनी दिली. चव्हाण म्हणाले की, मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं, पण असा मुख्यमंत्री होणे नाही असं मी जाहीर पणे सांगतो असं म्हणत चव्हाणांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केलं.

दरम्यान महाविकास आघाडी सरकार कोसळलं असलं तरी देखील मविआ आघाडी मजबुत ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र सभा घेत आहेत. वज्रमूठ सभेतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात सभा घेत आहेत. आणि पुढील काळात देखील मोठ्या जाहीर सभेचे नियोजन चालू आहे, असेही चव्हाण म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.