Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

छातीत बुक्की मारल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू

छातीत बुक्की मारल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू 



पुणे : खरा पंचनामा 

रिक्षा रस्त्यावर लावल्याने टेम्पोचालकांबरोबर भांडण झाले. त्यात टेम्पोचालकाने छातीत बुक्की मारल्याने एका रिक्षाचालकाचा जागीच मृत्यु झाला. जैनुद्दीन मोहम्मद नदाफ (वय ४८, रा. लोहगाव) असे मृताचे नाव आहे. विमानतळ पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन टेम्पोचालक अमोल नारायण सूर्यवंशी (वय २७, रा. वाघोली) याला अटक केली आहे. 

याबाबत बशीर मोहम्मद नदाफ (वय ३६, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना आपले घर सोसायटीजवळील एस कुमार प्रोमचा चहा समोर सार्वजनिक रोडवर शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला. 

जैनुद्दीन नदाफ हा रिक्षाचालक असून तो त्यांचा मित्र रिक्षा कडेला लावून रिक्षामध्ये गप्पा मारत बसलेले होते. त्यावेळी विरुद्ध बाजूने आलेल्या टेम्पोला जाण्यास जागा नसल्याने त्यांच्यात वाद झाला. यावेळी टेम्पोचालक अमोल सूर्यवंशी याने शिवीगाळ करुन जैनुद्दीन याच्या छातीत जोरात बुक्की मारली. त्यामुळे जैनुद्दीन हा कळवळला आणि जागीच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.